उमेदवारीवरुन सोशल मिडियावर शिक्षणमंत्री विनोद तावडे ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या संघटना तावडे यांच्यावर नाराज होत्या. शिक्षक भरतीबाबत त्यांच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. वेगवेगळ्या शहरात आंदोलनेही झाली. आता विधानसभा निवडणुकीत या नाराज शिक्षकांनी विनोद तावडे यांना ‘आता कसे वाटते’ असे म्हणत ट्रोल केले आहे.

विनोद तावडे यांच्यावर शिक्षक तसेच लाखो विद्यार्थी नाराज होते. त्यामुळेच भाजपाने तिसरी यादी जाहीर केल्यानंतरही त्यात विनोद तावडे यांचे नाव जाहीर न झाल्याने सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल झाला. त्यात ‘‘तिसऱ्या यादीतही नंबर न लागल्यावर विद्यार्थ्यांना काय वाटत असेल याची कल्पना विनोद तावडे यांना आली असेल. ’’ असा मेसेज व्हायरल होत होता. शुक्रवारी सकाळी भाजपाची चौथी यादी जाहीर झाली. त्यात विनोद तावडे यांचे तिकीट कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच एक मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला.

‘‘शिक्षक भरतीतील बेरोजगार शिक्षकाप्रमाणे माजी शालेय शिक्षण मंत्री ही घरी बसणार.’’
यावरुन विनोद तावडे यांच्याविषयी शिक्षकांमध्ये किती नाराजी होती, याचा प्रत्यय येत आहे.

visit : Policenama.com