अवघ्या १९ व्या वर्षी ‘तिने’ टाकले इंडस्ट्रीत पाऊल, आशियाई स्तरावरचे जिंकले खुप सारे अवॉर्ड्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टिव्हि आणि चित्रपटाची प्रसिद्ध प्रोड्यूसर एकता कपूर ही प्रसिद्ध अभिनेत्री जितेंद्र आणि शोभा कपूरची मुलगी आहे. सध्या ती ज्या यशाच्या शिखरावर आहे तिने हे यश स्वतः मिळवले आहे. बालाजी टेलीफिल्म्ससारख्या मोठ्या प्रोडक्शनला एकताने चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. फक्त टिव्हिवर नव्हे तर बॉलिवूडच्या वेब सीरीजला एकता जोडली गेली आहे.

एकताने आपल्या करिअरमध्ये ‘रागिनी एमएमए’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुम्बई’ असे अनेक चित्रपट केले आहे. तिने १९ वर्षात इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. एकताने ७० पेक्षा जास्त नाटकाची निर्मिती केली आहे.

एकता कपूर अनेक कलाकाराची ‘गॉड मदर’ म्हणून ओळखली जाते. विद्या बालनपासून ते सुशांत राजपुत पर्यंत कलाकार आहे. अनेक कलाकार तिच्या मालिकेत काम करुन आज मोठे स्टार झाले आहे. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध कलाकार राम कपूरला देखील एकता कपूरमुळे नवीन ओळख मिळाली आहे.

एकता २० वर्षाची असताना तिने शो ‘मानो या ना मानो’ प्रोड्यूस केला होता. एकताने सगळ्यात पहिले टिव्हीवर काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये ‘हम पांच’, ‘कहानी घर घर की’, ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’, ‘कहीं किसी रोज़’ असे अनेक शो तिने केले आहे. तिचे बरेच सिरीयल ‘क’ अक्षरापासून सुरु केले आहे. ‘कसौटी जिंदगी की’ ही एकताची आवडती मालिका आहे.

एकताला भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार. इंडियन टेली अवार्ड्स, कलाकार पुरस्कार, एशियाई टेलीव्हिजन अवार्ड असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.