काँग्रेसला ‘इव्हीएम’ च्या सुरक्षेबाबत शंका, ‘या’ नेत्याचे आयोगाला पत्र

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही वेळ राहिला असतानाच काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात लढत आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत देवरा यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

इव्हीएममध्ये फेरफार करता येऊ नयेत यासाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, अशी विनंती मिलिंद देवरा यांनी या पत्राद्वारे केली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी मतदान झाले होते. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.