वडिलांचा नवीन ‘जॅग्वार’ घेण्यास नकार, रागात आलेल्या मुलानं ‘BMW’कार नदीत बुडवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युवकाने रागाच्या भरात आपली BMW कार एका तलावामध्ये सोडून दिली कारण समजल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडलेला हा प्रकार आहे, मुलाने वडिलांकडे जॅग्वार कार मागितली मात्र वडिलांनी नवीन कार घेण्यास नकार दिल्यामुळे मुलाने रागाच्या भरात वापरात असलेली BMW कार तलावात सोडून दिली.

पुढे काय झाले त्या BMW चे ?
मुलाने रागाच्या भरात BMW कार वाहत्या पाण्यात सोडून दिल्यामुळे पुढे ही कार वाहत जाऊन एका ठिकाणी अडकली. स्थानिक नागरिक कार काढण्यासाठी प्रयत्न करू लागले, कार चा हा कारनामा पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

हरियाणा आणि पंजाब मध्ये महागड्या गाड्यांचे तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे त्यामुळे येथील तरुण मोठ्या प्रमाणावर BMW सारख्या महागड्या गाड्या वापरण्यात ऍग्रेसिव्ह आहेत.

या जॅग्वारच्या किमती ५० लाखा पासून सुरु होऊंन ५ करोड पर्यंत आहेत. मॉडीफाय करण्यासाठी या कारला आणखी खर्च येतो

BMW कारच्या किमतीबद्दल
BMW ची सगळ्यात स्वस्त कार ३० ते ३५ लाखांपासून सुरु होते, सर्वसामान्य लोकांमध्ये ही कार खूप आवडीचा विषय आहे. त्यामुळे या मुलाने एव्हडी महागडी गाडी कशी सोडून दिली याचेच सर्वांना आश्चर्य होते.

या मुलाला दर तीन महिन्यांना महागडी गाडी घेण्याची सवय होती, याच हट्टापायी वडिलांनी त्याला नवी गाडी घेण्यासाठी नकार दिला असावा यामुळे हि घटना घडल्याचे समजत आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like