‘इथं’ सुरू होणार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ‘स्कीम’, शेतीसाठी प्रत्येकाला मिळणार 25-25 हजार रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान योजना शुक्रवारपासून सुरु करण्यात आली मात्र त्यानंतर झारखंड राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. शनिवारपासून झारखंड सरकार स्थानिक शेतकऱ्यांना ५ एकर प्रमाणे वर्षाला २५ हजार रुपये देणार आहे. प्रधानमंत्री किसान योजनेव्यतिरिक्त ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते येत्या विधानसभेच्या निवडणूक लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. झारखंड राज्य हे शेतकऱ्याना एवढी मोठी मदत करणारे प्रथम राज्य ठरले आहे. या आधी देशात इतकी मोठी मदत अजून कोणत्याही राज्याने जाहीर केलेली नाही.

या योजनेची सुरवात राज्यातील सर्व जिल्ह्यानमधून एकसाथ होणार आहे. सुमारे ३५ लाख शेतकऱ्याना ३ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्याना औषध, बी – बियाणे यांसाठी कर्ज घ्यावे लागू नहे यासाठी राज्यसरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे समजते.