चारा छावण्यांसाठी शिवसेनेचे रास्ता-रोको ! पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – चारा छावण्यांवर एकतर्फी कारवाई छावण्या सुरू ठेवण्यासाठी शिवसेनेह शेतकऱ्यांनी नगर-पुणे रोडवर जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. सरकार जोपर्यंत छावण्या ठेवण्याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार संदेश कार्ले यांनी दिला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने आंदोलन आटोपते घ्यावे लागेल.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे बायपास चौकात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलन सकाळी दहा वाजता सुरु केले ते साडेअकरापर्यंत चालले. यावेळी मोठ्या प्रमाणात दुतर्फा रांगा लागल्या होत्या. नगर तालुक्यातील चार चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवून प्रशासनाने त्यांचे मान्यता रद्द केली आहे.

याबाबत शेरे बुकात कारवाईची कसलीही नोंद नाही. छावणीचालकांना कारवाईची कोणतीही कल्पना दिली गेली नाही. प्रशासनाकडून छावण्यांवर एकतर्फी कारवाई करण्यात आली. चालकांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता प्रशासनाकडून छावण्या बंद करण्याची कारवाई केली. छावण्या बंद झाल्याने जनावरांची उपासमार होत आहे. त्यामुळे या छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

विसापूर तलावात पाणी नसल्याने घोसपुरी पाणी योजना बंद पडली आहे. पाऊस नसल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे येत आहेत. पाणीटंचाई अन् चारा टंचाईने शेतकरी बेजार झाला असताना प्रशासनाकडून कोणतेही कारण न देता छावण्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप कार्ले यांनी केला.

छावण्यांची मान्यता रद्द केलेल्या गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. कारवाई केलेल्या छावण्यांधील जनावरे दुस-या गावच्या छावणीत न्या असा सल्ला प्रशासन शेतक-यांना देत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासन छावण्यांवर एकता कारवाई करत आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –