जाब विचारला म्हणून गंभीर मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भावाला शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच दुर्गानगर चिंचवड येथे घडली. अहमद सुलतान शेख (२४, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तो गंभीर जखमी झाला आहे. तर शुभम बनसोडे (रा. चिखली), पवन लष्करे (रा. चिंचवड), अक्षय पासलकर (रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अहमद यांचा भाऊ सद्दाम याला विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी अहमद गेले. आरोपींनी त्यांना दुर्गानगर येथील सीएनजी पंपाच्या मागच्या बाजूला बोलवले. अहमद तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने मारहाण केली. यामध्ये अहमद यांच्या पाठीवर, हातावर, पायावर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com