इंदापूर कर्मयोगीचा शनिवारी गळीत हंगाम शुभारंभ

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा फुलेनगर (बिजवडी) ता. इंदापूर येथिल कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 सालासाठी 30 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन कार्यक्रम शनिवारी दि. 23 नोव्हेंबर दुपारी 1 वा. कारखान्याचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांनी आज दिली.

कारखान्याने यापूर्वीचे 29 गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. मागील सन 2018-19 या गळीत हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन रु. 2601 दर दिलेला आहे. सदरचा दर हा एफआरपी पेक्षा प्रतिटन रु. 217 ने जास्त आहे. आगामी ऊस गळीत हंगामासाठी कारखान्याची ऊस तोडणी वाहतुकदार, कंत्राटदार यांची बैलगाड्या, बजाट, ट्रॅक्टर, ट्रक आदी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. आगामी गळीत हंगामात कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 8 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट पुर्ण करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने नियोजन केलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कर्मयोगी कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक बी. जी. सुतार व संचालक मंडळाने केलेले आहे.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहूल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, जयश्री नलवडे तसेच अधिकारी उपस्थित होते.

Visit : Policenama.com