मागील महिन्यातील ATM फोडल्याचा प्रकार उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाण्यातील तळवडे परिसरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी घडला असून आज मंगळवारी उघडकीस आला आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळवडे रस्त्यावर आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री चोरट्यांनी शटर उचकटून, एटीएम मशीन उचकटली. मात्र त्यांना मशीन मधील पैसे काढता न आल्याने चोरट्यांनी पळ काढला. हा प्रकार घडूनही बँकेने पोलिसांना माहिती दिली नाही.

पोलीस आयुक्तांनी हद्दीत गस्त घालणे आणि तपासणी करण्याची कडक मोहीम राबवली आहे. यामुळे मंगळवारी चिखली पोलीस तपासणी करत असताना हा प्रकार समोर आला. याबाबत बँक व्यवस्थापनास विचारले असता पैसे गेले नसल्याने तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात आले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like