यवत पोलिसांकडून 3 सराईत गुन्हेगार ‘तडीपार’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दौंड भागात जबरी चोरी तसेच वाहन चोऱ्या करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत. वागेश रामा देवकर (वय १९), गणेश सूर्यदर्शन शिंदे (वय २०) आणि मारुती विष्णू पोळेकर (वय २१, सर्व. पाटस) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तिघेही ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जबरी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांना जिल्हा तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात यावे असा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस नाईक सचिन होळकर, काळे, पोलीस कॉन्स्टेबल गजरे यांनी वरिष्ठाकडे पाठविला होता. त्यानुसार तिघांना १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

तिघांना एक वर्षाकरिता पुणे जिह्वा व पिंपरी-चिंचवड तडीपार केले असून तिघे जिल्ह्यात आढळून आल्यास तात्काळ यवत पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे.

Visit : Policenama.com