सर्वोच्च न्यायालयाकडून पी. चिदंबरम यांना तूर्तास दिलासा नाही

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आयएनएक्स मीडिया घोटाळयाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास तरी दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एनव्ही रामण्णा यांनी पी. चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्याकडे पाठविली आहे.

पी. चिदंबरम यांच्यावतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, सलमा खुर्शीद यांनी याचिका दाखल केली होती. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला होता. त्यानंतर तात्काळ सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या घरी जाऊन धडकले होते. तेव्हपासून ते बेपत्ता आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिला न दिल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –