माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची अटकपुर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आयएनएक्स मीडिया घोटाळयाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा काल (मंगळवारी) अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सीबीआयचे पथक चिदंबरमच्या घरी धडक देऊन आले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या पी. चिदंबरम यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकपुर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, काँग्रेसचे सलमान खुर्शीद आणि विदोन तनखा हे सर्वोच्च न्यायालयात पी. चिदंबरम यांच्या अटकपुर्व जामिनासाठी गेले आहेत. त्यावर सर्वोच्च न्यायालयात नेमका काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर पी. चिदंबरम हे कालपासून बेपत्ता झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –