माजी खासदार गांधींचे पुत्रासाठी ‘लॉबिंग’

नगर शहर मतदारसंघ भाजपला द्या : शहर पदाधिकाऱ्यांचा ठराव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर मतदारसंघाची जागा युतीच्या जागावाटपात भाजपला देण्यात यावी, असा ठराव शहर भाजपच्या बैठकीत घेण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांनी हा प्रस्ताव मांडला, त्यास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी अनुमोदन दिले. माजी खासदार दिलीप गांधी यांनी पुत्र सुवेंद्र गांधी यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी हे लॉबिंग सुरू केले आहे. त्यावर पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

dilip gandhi

बैठकीत बोलताना माजी खासदार गांधी म्हणाले की, ‘नगर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिका निवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नगर शहरातील मतांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नगरची जागा भाजपलाच मिळावी, असा ठराव प्रदेश कार्यालयाकडे पाठवत आहोत. प्रदेश भाजपकडून नगरच्या जागेसाठी मुलाखत होणार आहे. नगरची जागा भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने लढण्याच्या तयारीत आहे.’

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवकासाठी कटीबद्ध आहेत. यावेळी कुसूम शेलार, सुषमा प्रभाकर, नंदा कुसळकर, प्रशांत मुथा, मिलिंद भालसिंग, मनेष साठे, अंबादास घडसिंग, संतोष शिरसाठ, महेश हेडा, पियुष संचेती, लक्ष्मीकांत तिवारी, नरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

बुधवारी इच्छुकांच्या मुलाखती –
प्रदेश भाजप कार्यालयाकडून नगर जिल्ह्यातील सर्व 12 मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या बुधवारी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या शहर विभागाच्यावतीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नगरची जागा भाजपला सोडण्याची मागणी करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –