४ दिवसाच्या नवजात बाळाला ‘शॉक ट्रीटमेंट’ पद्धतीने ‘जीवनदान’ !

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतामध्ये एक हजार नवजात बालकांपैकी ८ ते १० बालकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार असल्याचे आढळून येत असतात. त्यामुळे प्रसूती होताना माता व अर्भकाची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन योग्य वैद्यकीय निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेताना अथवा वैद्यकीय उपचारास थोडाही विलंब झाला तर माता व अर्भकाच्या जीवाला धोका पोहचु शकतो. गर्भवती माता व नवजात बालकांना आधुनिक वैद्यकीय सेवा प्रदान करणाऱ्या नेरुळ नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे नुकतीच एका चार दिवसाच्या बाळाला इलेक्ट्रिकल कार्डिओ वरजन पद्धती म्हणजेच शॉक ट्रीटमेंट देऊन जीवनदान देण्यात आले.

बाळाच्या हृदयाचे ठोके वाढल्यामुळे एका महिलेची सिझेरीयन पद्धतीने प्रसूती करण्यात आली होती. प्रसूतीनंतरही बाळाची तब्येत स्थिरस्थावर न झाल्यामुळे त्याला तेरणा हॉस्पिटलमधील नवजात बालकांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागामध्ये अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. मनीषा शिरोडकर यांच्या देखरेखीखाली हलविण्यात आले. पाहिले दोन दिवस औषधे व इतर उपचार करून बाळाच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु त्या उपचाराला यश न आल्यामुळे बालहृदयशल्यचिकित्सक डॉ. भूषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाला शॉक ट्रीटमेंट देऊन त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ववत करण्यात आले.

…आणि हृदयाचे ठोके पूर्ववत झाले

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध बालहृदयशल्यचिकित्सक डॉ. भूषण चव्हाण म्हणाले, बाळ पोटामध्ये असताना बाळाच्या हृदयाचे ठोके जर वाढत असतील तर डॉक्टर लगेचच सिझेरीयन पद्धतीने प्रसूती करून बाळाचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करतात. अशा केसमध्ये जर बाळाची काळजी व उपचार योग्य पद्धतीने घेतले नाही तर बाळ दगावू शकतो. आम्ही चोथ्या दिवशी बाळाला इलेक्ट्रिकल कार्डिओ वरजन पद्धती म्हणजेच शॉक ट्रीटमेंट दिल्यावर बाळाच्या हृदयाचे ठोके नॉर्मल झाले व सातव्या दिवशी त्याला आम्ही घरी सोडले. नवजात बालकांमध्ये हृदस्पंदन वाढलेल्या वेगाच्या आजाराला सुप्रा व्हेंट्रीकुलर टॅकीकार्डिया संबोधले जाते. हृदयस्पंदनाचा वेग दर मिनिटाला ९० असला पाहिजे. परंतु, या केसमध्ये या बाळाच्या हृदयस्पंदनाचा वेग २०० होता व अशावेळी आम्ही त्याला शॉक ट्रीटमेंट देऊन त्याचा हृदयस्पंदनाचा वेग आम्ही पूर्ववत आणण्यात यशस्वी झालो.

वर्षभरात १३५०० बालकांचा मृत्यू

प्रसूतीच्या वेळी मातेचे आरोग्य, अर्भकाची सुरक्षितता, अर्भकाचा जन्म होताना असलेली परिस्थिती याचे सतत परीक्षण करणे आवश्यक असते. महाराष्ट्र सरकारच्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत १३५०० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता व यामध्ये २१ टक्के बालके जन्म झाल्यानंतर २८ दिवस ते १ वर्षांत दगावली आहेत.

‘या’ कारणांमुळे होतात आजार

गर्भवती महिलेला रक्तदाब, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा विकार असणे, गर्भाशयात दोष असणे, लसीकरणाचा अभाव, गर्भ पोटात असताना जड वस्तू उचलणे, खूप शारीरिक कष्ट, आहारात योग्य अन्न घटकांचा अभाव, आदी कारणे नवजात बालकांमध्ये विविध आजार होण्यामागे असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे देण्यात आली आहे.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like