लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून दुकानदाराची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एका दुकानदाराच्या बँक खात्यातून एनईएफटी द्वारे एक लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून दुकानदाराची फसवणूक केल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली.रोहित महादेव झाकडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हरीश गौरवर्धनलाल जांगीड (३३, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश यांचे पिंपळे गुरवमध्ये ‘शिवम स्टेशनरी अँड गिफ्ट’ हे दुकान आहे. त्यांचे पंजाब नॅशनल बँकेत चालू खाते आहे. आरोपी रोहित याने फिर्यादी हरीश यांच्या बँक खात्यातून एनईएफटी द्वारे एक लाख रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याने हरीश यांनी त्यांच्या बँकेत चौकशी केली आणि त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.