धुळे : क्रेडीट कार्डचा नंबर विचारून विक्रेत्याची फसवणूक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डचा नंबर विचारून एका विक्रेत्याची ९१ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवपुर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चंद्रशेखर हरि चव्हाण यांनी देवपुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर चव्हाण यांचा देवपूर येथील एकविरा शाळेजवळ स्टेशनरीचा व्यावसाय आहे. त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्या क्रेडीट कार्डचा नंबर, ओटीपी नंबर विचारून ९० हजार ४९८ रुपयांची खरेदी केली.

खरेदी न करता त्यांच्या खात्यातील रक्कम कमी झाल्याने त्यांनी बँकेत चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांच्या क्रेडीट कार्डवरून अज्ञात व्यक्तीने खरेदी केल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी देवपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.डी. सानप करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

You might also like