‘सोमेश्वर’ सभासदांना देणार एकरकमी FRP

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – सोमेश्वर सह.साखर कारखान्याने चालू हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला असून १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन २ हजार ७८९ रूपये प्रमाणे एफआरपी सभासदांच्या खात्यांंवर सोमवारी (दि.३०) वर्ग करणार असल्याची माहिती ‘सोमेश्वर’चे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.

जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने सभासदांना संपुर्ण एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांना संपुर्ण एफआरपी देणारा ‘सोमेश्वर’ हा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरणार आहे. या हंगामात सभासदांंच्या संपुर्ण ऊसाचे वेळेत गाळप करून गतवर्षीप्रमाणेच कारखाना अग्रेेसर ठेेवण्यासाठी संचालक मंंडळ प्रयत्नशील असून यावर्षी अवकाळी पावसामुळे व त्यामुळे झालेल्या हवामानातील बदलामुळे संपुर्ण राज्यातच ऊसाला मोठ्या प्रमाणावर तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सभासदांचा ऊस एप्रिल महिन्याअखेर गाळप करण्याच्या दृष्टीने कारखान्याने संपुर्ण गेटकेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगताप पुढे म्हणाले की, सोमेश्वर कारखान्याने चालु गाळप हंगामात २६ डिसेंबर अखेर १ लाख ९५ हजार ८८५ मे.टन ऊसाचे गाळप केले असून त्यापैकी डाळप केलेल्या ऊसाच्या पाच टक्के म्हणजेच जवळपास ११हजार मे.टन गेटकेन ऊसाचे गाळप केले आहे. या गाळप झालेल्या ऊसातून सरासरी १०.७० टक्के साखर उतारा राखुन २ लाख ८ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याच्या सहविजनिर्मिती प्रकल्पातून १ कोटी ८१ लाख ६९ हजार युनिटसची निर्मिती केली असून १ कोटी २१ लाख ६२ हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले आहे.

पुणे जिल्ह्यातील इतर कारखान्याबरोबर अंतिम ऊसदराबाबतीतही ‘सोमेश्वर’ कारखाना कमी पडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करून सभासदांनी इतर कारखान्यास ऊस न घालता ‘सोमेश्वर’ कारखान्यातच ऊस गाळपास आणून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी केले.

‘सोमेश्वर’ला व्हीएसआयचा सर्वोत्तम डिस्टीलरीचा पुरस्कार

सोमेश्वर कारखान्यास यंदाचा व्हीएसआयचा राज्यातील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्तम डिस्टीलरीचा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला असून चिफ केमिस्ट शिवशंकर भोसले यांना यंदाचा चिफ केमिस्ट पुरस्कार मिळाला आहे. तसेच व्हीएसआयचा उत्कृष्ट तांत्रिक क्षमता, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापण असे पाच वर्षात पाच पुरस्कार मिळाले असल्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/