पूर्व हवेलीत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जल्लोषात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) – पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी गावामध्ये लहान-मोठ्या मंडळासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. थेऊर येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या चिंतामणी मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने सजले आहे. गणेशोत्सवानिमित्त मंदिरात महाआरती, धुपारती, छबिना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

उरुळी कांचन येथील आश्रम रोड परिसरात महात्मा गांधी तरुण मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, शिवछत्रपती मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ बाजार मैदान येथील अनुपम मित्र मंडळ भोलेनाथ तरुण मंडळ, गूळ आळी येथील श्रीमंत वीर तरुण मंडळ, तुपे वस्ती येथील नवजीवन मित्र मंडळ महात्मा गांधी रास्ता परिसरातील श्रीकृष्ण मित्र मंडळ, तळवडी चौक परिसरातील अखिल तळवडी मित्र मंडळ, शिंदवणे रोड येथील नवआझाद मित्र मंडळाप्रमाणे परिसरातील सर्व गणेश मंडळे व घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या वतीने गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील जी.एम. ग्रुप च्या वतीने गणेमूर्तीची ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. लोणी काळभोर गावातील श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळ, क्रांतिवीर व समता समाज मित्र मंडळ, तिरंगा व गणराज मित्र मंडळ, आदर्श तरुण मित्र मंडळ आखील रायवाडी मित्र मंडळ महात्मा फुले व त्रिमूर्ती मित्र मंडळ आदि मंडळांनी उत्सवात बाप्पाचे स्वागत करण्यात आले.

कदमवाकवस्ती येथील लोणी स्टेशन परिसरातील मुनलाइट मित्र मंडळ, यंग बॉइज मित्र मंडळ, श्रीगणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. संभाजीनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळ, कदमवस्ती येथील सम्राटमित्र मंडळ, वाकवस्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळ, कवडीपाट येथील श्री विनायक प्रतिष्ठान मित्र मंडळाने गणेश मूर्तींची प्रतिष्ठापणा केली.

आरोग्यविषयक वृत्त