मित्रावर कोयत्याने वार करत तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कॉलेज मध्ये असणाऱ्या तरुणांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणीचा विनयभंग करुन, तिच्या मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार मरीआई माता मंदिराजवळ ओटास्किम येथे घडला.

अभिजित तांबवे, सुनील चव्हाण, अविनाश लष्करे आणि अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिकतात. मागील सहा महिन्यांपूर्वी फिर्यादी तरुणीचे आरोपींसोबत भांडण झाले. शनिवारी रात्री सातच्या सुमारास पीडित तरुणी, तिचा मित्र आदित्य बाविस्कर आणि तिचा भाऊ एका ठिकाणी बोलत उभे होते. त्यावेळी पूर्वी झालेल्या वादातून आरोपींनी आदित्यला शिवीगाळ करून लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी पीडित तरुणीच्या भावाने तेथून पळ काढला.

सर्व टोळके तरुणीच्या घरी गेले. ‘भाऊ कुठे आहे सांग नाहीतर मारून टाकीन’ अशी धमकी देत तरुणीसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच घरातील सामानाची व रिक्षाची तोडफोड करुन नुकसान केले. तपास निगडी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like