चक्क सई ताम्हणकर बनली ‘त्याची’ गर्लफ्रेंड !

मुंबई : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर ‘त्याने’ गर्लफ्रेंड पाहिजेची पोस्ट टाकली नाही तोच, ‘त्याची’ गर्लफ्रेंड दुसरी -तिसरी कुणी नसून चक्क सई ताम्हणकर बनली आहे. धक्का बसू देऊ नका. ही गर्लफ्रेंड रियल नाही तर ‘रील’ लाइफमधील आहे. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर हे दोघे ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २६ जुलैपासून येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘गर्लफ्रेंड पाहिजे’ अशी पोस्ट अभिनेता अमेय वाघने सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. पण आता अमेयला त्याची गर्लफ्रेंड मिळाली असून त्याची गर्लफ्रेंड दुसरी कोणी नसून अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. अमेय आणि सई ही जोडी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. नुकताच त्यांचा एकत्र फोटो चाहत्यांसमोर आला. त्यामुळे चाहते या जोडीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटासाठी अमेयनं चक्क आठ किलो वजनही वाढवलंय म्हणे.