बाभळगाव येथे गोष्ट रंग रुपी नाटक कार्यक्रम संपन्न

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे पालवी प्रकल्पा अंतर्गत गोष्ट रंग रूपी नाटकाचे सादरीकरण 11/मार्च रोजी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला बाभळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बाभळगाव येथील ग्राम पंचायत सांस्कृतिक सभा मंडपात बुधवार रोजी सकाळी दहा वाजता गोष्ट रंग रुपी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. पालवी प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी बालकांसाठी यावेळी कलाकारांनी मनोरंजनात्मक नाटकाचे प्रयोग केले. उपस्थित बालकांच्या चेहर्‍यावर हास्य भाव उमटले पाहायला मिळाले.

यावेळी आयसीडीएस प्रकल्प अधिकारी श्रीमती गायकवाड, पालवी टीमच्या प्रियंकाताई, वैभव, अंगणवाडी शिक्षिका कानडेबाई, रणेर, गिरी, सावळीकर, मदतनीस कांबळे, वावधाने, शिराळे, लहाडे, वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांनी पुढाकार घेतला. यावेळी बाभळगाव येथील अंगणवाडीतील बालकांची उपस्थिती होती.