राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने 5 दिवसांचा आठवडा केल्याने पेढे वाटून व्यक्त केला आनंद

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे येथे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील उपनिबंधक कार्यालयासमोर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत मार्च महिन्यापासून पाच दिवसांचा आठवडा केला. याकरता कर्मचारी संघातील सहकारी एकत्र येत यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. पेढे वाटून आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला. व कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या हि शासनाने पूर्ण कराव्यात अशी मागणी केली.

यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, आनंद तायडे, सुधीर पोतदार, राजेंद्र विरकर व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.