ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांचा जनकल्याण सेवा संस्थेकडून गौरव

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – लोणी काळभोर येथील ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांना पर्यावरण विषयक महान कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने सन २०२० चा राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार माजी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे तसेच पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरूजी यांच्या हस्ते अमित जगताप यांना हा पुरस्कार शाहू स्मारक येथे प्रदान करण्यात आला.

ग्रीन फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमात वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, गुड टच बॅड टच, महापुरूष जंयती, रक्त दान, पक्षांना पाणी व धान्य ची सोय, स्वच्छता मोहीम, जनजागृतीचे कार्यक्रम, वृक्ष संवर्धन मोहीम, पाणी आडवा पाणी वाचवा जनजागृती अभियान, ग्रंथालयास पुस्तक वाटप, फाउंडेशन च्या माध्यमातून पुरस्कार, बेटी बचाव बेटी पढाव मोहीम, आरोग्य शिबीर, अन्नदान, सन उत्सव, गरीब गरजू लोकांना वैद्यकीय सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम, वनीकरण कार्यक्रम, पर्यावरण संरक्षण मोहीम, गड किल्ले संवर्धन मोहीम, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, साहित्य संमेलन, लोक नाट्य. शाहीरी, नृत्य, संगीत अभियान, झाडे लावा झाडे वाचवा मोहीम, कचरा व्यवस्थापनेबाबत लोकांन मध्ये जनजागृती, रांगोळी स्पर्धा, हे सर्व उपक्रम राबविण्यात येतात. याच कार्याची दखल घेऊन कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्था यांनी या फाऊंडेशनचा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.

या वेळी रेखा दिनकर पाटील, विशाल दत्त प्रदेशाध्यक्ष इंटरनॅशनल हिंदू फाउंडेशनचे विशाल दत्त, बाळासाहेब चव्हाण, उदयसिंह पाटील, प्रकाश पाटील, अजितकुमार पाटील, डी एम चांदणे, सुरेश पाटील, सुनित पाटील, सागर पाटील, एस.के.नाळे, प्रा.पी.जी.अंगज, सोमनाथ कोरे, एम.आर पाटील, बाळासाहेब कांबळे, दिगंबर जगताप, मयुर काळभोर, लखन पवार, दिगंबर जोगदंड, अमीर सय्यद, आदी मान्यवर उपस्थित होते.