GST चा वार्षिक रिटर्न भरण्याची ‘ही’ असणार अंतिम तारीख

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) वार्षिक परतावा (रिटर्न) भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2019 असणार आहे. त्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या फाॅर्मच्या जीएसटीआर 9 च्या काही वर्गवारीनुसार सरकारने स्पष्टीकरण जारी केले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क समितीकडून याबद्दलचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

यात म्हणल्याप्रमाणे, 1 मे 2019 पर्यंत फाॅर्म जीएसटीआर 2 मध्ये देण्यात आलेली माहिती फाॅर्म जीएसटीआर 9 च्या टेबल 8 ए मध्ये स्वत:ला पाहावी लागेल. अशाच प्रकारे एप्रिल 2018 ते मार्च 2019 पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेवर इनपुट टॅक्स क्रेडीटला फॉर्म जीएसटीआर 9 च्या टेबल क्रमांक 8 सी मध्ये दर्शवला जाऊ शकतो.

यामध्ये सांगण्यात आले आहे की, आर्थिक वर्ष 2017 – 18 व्यवहाराला एप्रिल 2018 पासून मार्च 2019 मध्ये भरण्यात आलेल्या परताव्याला फाॅर्म जीएसटीआर 9 च्या पीटी – वी मध्ये देखील घोषित केले जाऊ शकते.