पालकमंत्र्यांनी धरली ‘चाड्यावर मूठ’ ; शेतात जाऊन केली पेरणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान काल मंत्रिपदाचा लवाजमा बाजूला ठेवून शेतात ‘चाड्यावर मूठ’ धरून पेरणी केली. त्यानंतर आषाढी एकादशी च्या निमित्ताने “महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होउ दे आणि बळीच राज्य येऊ दे!” अशी नामदार राम शिंदे यांनी विठ्ठलाला प्रार्थना केली.

शिंदे हे जामखेड तालुक्यात दौऱ्यावर असताना शेतकरी शेतात पेरणी करत असल्याचे पाहून त्यांनी गाड्यांचा ताफा थांबविला. मंत्री राम शिंदे यांनी गाडीतून उतरत थेट शेत गाठले. शेतकऱ्यांकडून दावे हातात घेऊन पेरणी सुरू केली. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी ही आवक झाले. शिंदे यांना पेरणी करताना पाहण्यासाठी गर्दी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत खते बी-बियाणे तसेच येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणतीही अडचण आल्यास थेट मला संपर्क साधा, असे सांगण्यासही राम शिंदे विसरले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर घातलेला थोडा वेळही शेतकऱ्यांना एक वेगळा आनंद देऊन गेला. काही काळ पेरणीचा आनंद घेऊन शेतकऱ्यांसोबत बातचीत करून शिंदे पुढील नियोजित दौऱ्यास निघाले.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’