…तर हर्षवर्धन पाटील ‘भाजप’मध्ये जाणार ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकीकडे ग्रहण लागलेले असताना आता आघाडीच्या जागांवरून सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे. इंदापूरच्या जागेवरून काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांना लढायचे आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणची जागा सोडायला तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक आजी माजी आमदार आणि पदाधिकारी घड्याळ सोडून कमळ हातात घेताना दिसले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती.

१९९० ते २०१४ अशा कालखंडात हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या मतदारसंघातून आमदारकीसाठी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती आणि ते सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडूनही आले होते. मात्र २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आघाडी तुटल्याने यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीचे दत्ता भरणे याने पराभूत केले होते.

सध्या या ठिकाणी राष्ट्रवादीचे दत्ता भरणे हे आमदार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही जागा सोडणार नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.

You might also like