हलक्याशा शारीरिक हालचालीही वाढवू शकतात आयुष्य

पोलीसनामा ऑनसाईन – ज्या लोकांना व्यायामासाठी वेळ काढणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी एक चांगली खबर आहे. एका ताज्या अध्ययनाआधारे शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हलक्याशा शारीरिक हालचालींद्वारेसुद्धा कर्करोग, वा अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यूची जोखीम कमी केली जाऊ शकते. धावणे, सायकल चालविणे व अन्य खेळांत सहभागी होण्याचे वेगळे लाभ आहेत, पण हलक्याशा शारीरिक हालचालीचे फायदे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही.

या अध्ययनादरम्यान १९९७ ते २००८ दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात सहभागी ८८ हजार लोकांच्या शारीरिक हालचालींच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या लोकांचे वय ४० ते ८५ वर्षे होते. त्यानंतर डिसेंबर २०११ पर्यंत नोंद झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीशी त्याची तुलना करण्यात आली. त्यांनी २००८ मधील अमेरिकी दिशा-निर्देशांतील व्याख्येचा वापर करून या लोकांनी फावल्या वेळेत केलेल्या शारीरिक हालचालींची गणना केली.

त्यात असे दिसून आले की, एखादी व्यक्ती एक मिनिट धावत असेव वा वेगाने सायकल चालवत असेल तर दोन मिनिटे आरामात चालविणे वा बागकामाएवढेच शारीरिक श्रम करते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, या अध्ययनादरम्यान कमीत कमी दहा मिनिटे चालण्याच्या हालचाली लक्षात घेण्यात आल्या. नि्क्रिरय लोकांच्या तुलनेत आठवड्यातून १५ ते ५९ मिनिटे हलक्या शारीरिक हालचाली करणाऱ्या लोकांच्या मृत्यूची जोखीम १८ टक्क्यांनी कमी आढळून आली. जसजसा वेळ वाढत जातो, तसा आरोग्याच्या लाभात सुधारणा पाहण्यास मिळाली.