‘कॉफी’त आढळणारे संयुग करू शकते हृदयरोगापासून बचाव

पोलीसनामा ऑनलाईन – हृदयरोगांपासून बचाव करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांना मोठी सफलता मिळविली आहे. त्यांनी कॉफी आणि कोकोमध्ये आढळून येणाऱ्या एका अनोख्या संयुगाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने हृदयाच्या आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो.

डेन्मार्कमधील आरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांच्या माहितीनुसार, पॉलीफेनोलचे सेवन आणि ह्रदयरोगाची जोखीम कमी होणे याच जवळचा संबंध आढळून आला आहे. आहारामध्ये पॉलीफेनोलच्या मुख्य स्रोतांमध्ये कॉफीसुद्धा एक आहे. या पेयपदार्थामध्ये हे संयुग नैसर्गिक रुपात तयार होत असतो. कॉफीची चव आणि सुगंधात महत्त्वाची भूमिका असते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने पॉलीफेनोलमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटोरी प्रभाव पाहण्यास मिळाला आहे.

या नव्या अध्ययनात असेही दिसून आले की, पॉलीफेनोलमध्ये ह्रदयाची सुरक्षात्मक कार्यक्षमता असू शकते. मात्र हे तंत्र अजून पूर्णपणे समजून घेतले जाऊ शकलेले नाही. त्यामुळे त्यावर आणखी अध्ययन करण्याची आवश्यकता आहे.