कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र ‘जलमय’ ! पन्हाळ्याहून मसाई पठारकडे जाणारा रस्ता खचला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोयना धरण परिसरात रात्रभरापासून मुसळधार पाऊस पडत असून धरण ९० टक्के भरले आहे. धरणातून १९ हजार क्युसेस पाणी नदीत सोडण्यात येत आहे. कृष्णा खोऱ्यातील जवळपास सर्व नद्यांवरील धरणे ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. दरम्यान, कोल्हापूरात पन्हाळयाहून मसाई पठारकडे जाणारा रस्ता खचला आहे.

वारणावती धरण ९५ टक्के भरले असून धरणातून २० हजार क्युसेस पाणी नदीत सोडण्यात येत आहे.
राजाराम बंधाऱ्याच्या धोक्याच्या पातळीवरुन पाणी वाहत आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येत असल्याचे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भिलवडी पुल पाण्याखाली गेला असून भिलवडी बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. कऱ्हाड शहरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सांगली येथील आयर्विन पुलाची धोका पातळी ४० फुट समजली जाते. सध्या येथील पाण्याची पातळी ४० फुटाहून अधिक झाली असून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली असून सांगलीमध्ये पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर व सिमेलगतच्या भागात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कर्नाटकातील नद्यांना पूर आला असून कृष्णा नदीही धोक्याचा पातळीवरुन वाहू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –