हेल्मेट सक्तीवरील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर पुण्याचे पोलीस आयुक्त बॅकफुटवर ? ; आता हेल्मेटविरोधी कारवाई शिथील होणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील हेल्मेटसक्तीवरून ८ आमदारांनी रान पेटवत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात हेल्मेटविरोधी कारवाई मुंबई आणि नागपूरप्रमाणे राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी यावर स्वत: प्रतिक्रिया दिल्यानंतर मात्र पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम हे बॅकफुटवर गेले असून पुण्यातील हेल्मेटविरोधी कारवाई शिथिल करणार काय असा प्रश्न उपस्थित करण्यात झाला आहे. हेल्मेट सक्तीवरून सक्त असलेले पोलीस आयुक्त यानंतर काय पाऊल उचलणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागलेले आहे.

पुण्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्‍यांची घेतली भेट
पुण्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुण्यातील नागरिक हेल्मेट सक्तीमुळे त्रस्त असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला असल्याची भावना व्यक्त केली. आमदार माधूरी मिसाळ, विजय काळे, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकिर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्र्यांना पुण्यातील हेल्मेट सक्तीची कारवाई थांबविण्याचे साकडे घातले.

काय म्हणाले मुख्यमंत्री
हेल्मेट सक्तीला आमचा विरोध नाही. फक्त ज्याप्रकारे नागरिकांना त्रास दिला जातोय. पाच पाच पोलीस रस्त्यात उभे राहतात. नागरिकांना अडवतात. त्यामुळे रांगा लागतात. त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे मी पोलीस आयुक्तांना निर्देश दिले की, ज्याप्रमाणे मुंबई आणि नागपूरमध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाते त्याप्रमाणे पुण्यातही सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारवाई करा. नागरिकांना त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये चलन पाठवा. म्हणजे ते आपोआपच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार नाहीत. असे ते म्हणाले.

हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा विरोध
पुण्यात हेल्मेट सक्ती लागू केल्यापासूनच पुणेकरांनी हेल्मेटसक्तीला विरोध केला होता. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पदभार स्विकारल्यापासूनच पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई कऱण्याचे धोरण अवलंबले होते. त्यांनी नववर्षाच्या सुरवातीलाच पुण्यात हेल्मेटच सक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी पुण्यात हेल्मेट सक्ती केली जाणार नाही परंतु कारवाई सुरुच राहणार असल्याचे जाहीर केले होते. सीसीटिव्हीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरु असतानाच पुण्यात पोलिसांकडून चौकातचौकात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती. त्याला हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने जोरदार विरोध केला होता. तर सर्व पक्षीय आमदार, कार्यकर्त्यांनीही याविरोधात आंदोलने केली होती.

हेल्मेट सक्तीचा फार्स, कारचालक, रिक्षाचालकांना देखील
पुण्यातील पुण्यात हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर पुणे पोलिसांचे ताफेच्या ताफे चौकाचौकात वाहनचालकांवर कारवाई करत उभे असतात. मात्र पुण्यात अजब प्रकारही समोर आले आहेत. अनेकदा कारचालकाला आणि रिक्षाचालकांनाही हेल्मेट न घातल्याचे चलन पाठविण्यात आले होते. पुण्यातील प्रसाद तुळजापुरकर या व्यक्तीला हेल्मेट न घातल्याचा दंड लावण्यात आला होता. तर एका रिक्षाचालकालाही दंड लावण्यात आला होता.

चौकाचौकात पोलिसांच्या टोळ्या
पुण्यातील चौकाचौकत वाहतुक पोलिसांच्या टोळ्याच पहायला मिळतात. चौकाचौकांमध्ये ४ ते ५ पोलीस घोळक्याने वाहनचालकांना अडवून कारवाई करण्यात मग्न असतात. त्यानंतर मात्र तेथे वाहतुक कोंडी झाली, इतर वाहने गेली, आणि अवैध वाहतुक सुरु असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वाहनचालक सांगतात. तर या जथ्थ्यांनी अडवून कारवाईमुळे वाहनचालकांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

पाच महिन्यांत पुण्यात १९ कोटींचा दंड वसूल
पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरु झाली. तेव्हापासून हेल्मेट न वापरणाऱ्या पुणेकरांवर हेल्मेट सक्तीची कारवाई करून महिन्याकाठी कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात येत होता. पुण्यात १ जानेवारीपासून पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत पाच महिन्यात तब्बल ४५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला तर यात एकट्या हेल्मेट कारवाईत ३ लाख ९२ हजार ५४६ दुचाकीचालकांकडून पोलिसांनी १९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पोलीस आयुक्त बॅकफुटवर ?
पुण्यात नागपूर आणि मुंबई प्रमाणे सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले. तर पुण्यात नागरिकांवर कारवाई चौकाचौकात करून नागरिकांना त्रास देऊ नये. त्यापेक्षा चलन त्यांच्या घरी पाठवावे. असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आमदारांच्या भेटीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम हे बॅकफुटवर जाऊन खरंच ही कारवाई शिथिल करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक बातम्या
‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
दम्याने त्रस्त असाल तर “घ्या” ही काळजी 
पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम