जेव्हा ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी गव्हाची कापणी करते…

मथुरा : वृत्तसंस्था – सार्वत्रिक निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. कधीही एसी गाडीतून खाली न उतरणारे उमेदवारही आता बांधाबांधावर फिरु लागले आहे. त्याला अर्थात आपली ड्रीमगर्लही अपवाद नाही. मथुरा लोकसभा मतदार संघातून पुन्हा नशीब अजमावणाऱ्या ड्रीमगर्ल हेमामालिनीची सध्या जोरात चर्चा आहे. प्रचारादरम्यान तिने गव्हाची कापणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हेमा मालिनी यांनी स्वत: हे फोटो आपल्या ट्विटरवरुन शेअर केले आहे.

प्रचार करताना हेमामालिनी मथुरातील गोवर्धन परिसरात गेल्या होत्या. शेतात गव्हाची कापणी सुरु होती. तेव्हा हेमा मालिनी यांनी गव्हाची कापणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमा केलेला भारा उचलून तो दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवला. मथुरा लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. येथे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. हेमा मालिनी या विद्यमान खासदार असून त्या सपा -बसपा आघाडीचे उमेदवार कुवर नरेंद्र सिंह आणि काँग्रेस उमेदवार महेश पाठक यांच्याशी लढत देत आहे.