बीड : तरुणास बेदम मारहाण ; मारेकरी सीसीटीव्हीत कैद

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – प्लबिंगचे काम करणाऱ्या तरुणास फोन करून बोलावून घेऊन काठी, कोयत्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी रात्री जिजामाता चौकात घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रेम रमेश जाधव (वय-२५ रा. हनुमान नगर) याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

प्रेम जाधव हा प्लबिंगचे काम करतो. रविवारी रात्री सातच्या सुमारास एकाने प्लबिंगचे काम असल्याचे सांगून फोन करून जिजामाता चौकात बोलावून घेतले. प्रेम जिजामाता चौकात पोहचताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाच जणांनी काठी आणि कोयत्याने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रेम जाधव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रेम जाधव याला मारहाण करणारे पाचजण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.