मुलाच्या ११ व्या वाढदिवशी ऋतिक झाला भावनिक, सुजैन विषयी व्यक्त केले प्रेम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवुडचा अभिनेता ऋतिक रोशन चित्रपटा व्यतिरिक्त नेहमी त्यांच्या मुलासोबत व त्याची एक्स पत्नी सुजैन सोबत चर्चेत असतो. दरम्यान ऋतिक त्याच्या मुलाच्या ११ व्या वाढदिवसानिमीत्त चर्चेत आला आहे.

१ मे ला ऋदान चा वाढदिवस होता. या दिवशी एकदम वेगळ्या अंदाजात ऋतिक ने मुलाला शुभेच्छा दिल्या. त्यांने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये ऋतिक सोबत त्याची मुले दिसत आहे. हा व्हि़डिओ शेअर करत ऋतिकने मुलासाठी व्हिडिओला खुप छान कॅप्शन दिले. त्या कॅप्शन मध्ये लिहले की, आपले जीवनाला अजुन एक्सप्लोर कर, स्वतःला एक्सप्लोर कर, एक्सप्लोर बन, गर्दीच्या मागे पळू नको, स्वतःचा आनंद शोध, दुसऱ्यांसोबत स्वतःची तुलना करु नकोस, स्वतःच्या ध्येयाकडे पाहत त्या उत्साहाने प्रयत्न कर, या जगात दुसऱ्यांपेक्षा जास्त मेहनत कर. एवढे म्हणून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुलाला दिलेल्या या संदेशाला त्याच्या चाहत्यांनी खुप लाईक केले आहे. चाहत्यांनी कमेंट मध्ये ऋदान ला शुभेच्छा ही दिल्या आहेत. त्याचबरोबर सुजैन ने ही तिच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुजैन ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओ ला कॅप्शन दिले आहे. happiest happy 11!!!