हैदराबाद डॉक्टर मर्डर : गँगरेपनंतर ‘नराधम’ तिला पेटवण्यासाठी ‘बाटली’ घेवुन पेट्रोल पंपावर पोहचले, कर्मचार्‍यानं सांगितली संपुर्ण ‘स्टोरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  हैदराबादमध्ये २६ वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या निर्घृण हत्येने सर्वजण घाबरले आहेत. या संपूर्ण प्रकरणात एका व्यक्तीचे नाव पुढे येत आहे, ज्याने चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना मदत केली. सायबराबाद पोलिसांनी शुक्रवारी चार आरोपी मोहम्मद आरिफ (वय २६), जोलू शिवा (वय २०), जोलू नवीन (वय २०) आणि चिंताकुंटा चिन्‍नाकेशवाउलू (वय २०) यांना अटक केली. हे सर्व जण नारायणपेट जिल्ह्यातील आहेत. पोलिस कारवाईत सर्व आरोपींना ४८ तासांच्या आत अटक केली गेली.

Hydrabad Gangrape

१०० नंबरवर केला पोलिसांना कॉल
या प्रकरणातील लिंगाराम प्रवीण गौडा हा एक महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो. सदर प्रकरणाविषयी वृत्तवाहिन्यांनी प्रसारण सुरू करताच शमशाबाद पोलिसांना गौडाच्या वतीने आपत्कालीन हेल्पलाईन नंबर १०० वरून कॉल करण्यात आला होता. गौडा या भागात असलेल्या पेट्रोल पंपावर काम करतो. प्रवीणने पोलिसांना सांगितले होते की आदल्या रात्री लाल स्कुटरवरील दोन मुलांनी प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्यावर शंका घेतल्याने त्यांना पेट्रोल नाकारले गेले. प्रवीणने पोलिसांकडे दावाही केला होता की त्याची छायाचित्रे जर त्यांना दाखविली गेली तर तो त्यांना ओळखू शकेल.

माहितीमुळे पोलिसांना मदत झाली
प्रवीण यांनी दिलेल्या माहितीमुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना मदत झाली. पोलिस कोठडी अहवालात पुष्टी झाली की खुनाच्या रात्री या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन असलेला जोलू शिवा हा पीडितेची दुचाकी दुरुस्त करण्याच्या उद्देशाने गेला होता. दरम्यान, पीडित मुलीला जबरदस्तीने एक प्लॉटवर नेऊन सामूहिक बलात्कार केला गेला. शिवाने स्कूटीला दुरुस्त करून आणले होते आणि नंतर त्यानेही डॉक्टरवर बलात्कार केला. पीडित डॉक्टर महिला मोठ्याने ओरडत होती त्यामुळे तिला दारू पिण्यास भाग पाडले जात होते. यानंतर तिची हत्या करण्यात आली.

Hydrabad Gangrape

आरिफ डिलिव्हरीसाठी हैदराबादला आला होता
शादनगरच्या दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी चारही आरोपींना १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले. चारही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्यांना शादनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरीचा चालक असलेला मोहम्मद आरिफ हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मंगळवारी तो हैदराबादमध्ये एक डिलिव्हरी करणार होता. ज्याच्या घरात सामान पाठवायचे होते तो सापडला नाही. आरिफ याने आपले क्लिनर जोलू शिवा यांच्यासह उर्वरित दोन दोषींना बोलावून लॉरी टोंडुपली टोल गेटजवळ उभी केली. हे ठिकाण हैदराबादच्या बाहेर आहे.

‘मी खूप घाबरली आहे’
या योजनेचा एक भाग म्हणून नवीनने पीडित मुलीच्या स्कूटरचा टायर पंक्चर केला आणि नंतर ती परत येण्याची वाट पाहत थांबला. रात्री ९ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास पीडित मुलगी आपली स्कूटी घेण्यासाठी परत आली असता आरिफ त्याच्या लॉरीमधून बाहेर आला. त्याने सांगितले की तिच्या स्कूटरचा टायर पंक्चर आहे. यानंतर तिने त्याला दुरुस्ती करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आरिफने स्कूटी दुरुस्त करण्यासाठी क्‍लीनर शिवाला पाठविले. त्याचवेळी पीडित मुलीने आपल्या बहिणीला फोनवरून सांगितले की ती खूप घाबरली आहे.

Visit : policenama.com