IDBI बँकेतील अकाउंट ‘हॅक’ करण्याचा प्रयत्न ; बॅंक अधिकाऱ्यांच्या सतर्कने टळली मोठी फसवणूक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक करून सुमारे ४५ लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँक खात्यांवर वर्ग करण्याचा प्रयत्न झाला. परंतु बँक अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. रविवारी (दि. 9) हा प्रकार घडल्यानंतर शहर बँकेच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून काल सायंकाळी अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेच्या दिल्ली गेट शाखेमध्ये चालू खाते आहे. रविवारी बँकांना सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी शहर बँकेच्या खात्यातून अचानक ४५ लाख रुपये काढल्याचे एसएमएस शहर बँकेच्या अधिकाऱ्याला आले. हे पैसे सत्तावीस वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग झाले. शहर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आयडीबीआय बँकेला अधिऱ्यांना संपर्क करून हा व्यवहार अनधिकृत असल्याचे सांगितले. आयडीबीआय बँकेने तात्काळ हा व्यवहार रोखला. त्यामुळे शहर बँकेची मोठ्या रकमेची फसवणूक टळली.

शहर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बँक अकाउंट हॅक करून पैसे दुसऱ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत ३९ लाख रुपये वर्ग केलेले खात्यांवरील व्यवहार बँकेशी संपर्क करून थांबविण्यात आले आहेत. तर सहा लाख रुपयांबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती सायबर पोलिस स्टेशनकडून मिळाली.

बँकेचे नुकसान नाही : चेअरमन

शहर सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँकेमधील खात्यावर अनधिकृत व्यवहार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बँकेचे अधिकारी संजय मुळे व समीर जोशी यांच्या जागृतीमुळे बँकेने त्वरित आयडीबीआय बँकेला कल्पना दिली. त्यामुळे शहर बँकेचे नुकसान झाले नाही. याबाबत सायबर पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. या घटनेमुळे शहर सहकारी बँकेचे आर्थिक नुकसान झालेले नाही, अशी माहिती शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा यांनी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like