मित्राला ‘IIT’मध्ये प्रवेश मिळू नये यासाठी ‘थेट’ ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतच ‘फेरफार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाच वर्ष एकाच शाळेत, एकाच वर्गात शिक्षण, वर्ग मित्र मात्र नेहमीच शिक्षणात तू पुढे की मागे याची स्पर्धा, बारावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण, यातच मित्राला ‘आयआयटीत’ प्रवेश मिळणार आणि आपल्याला नाही यातुन थेट ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतच फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड येथे उघडकीस आला आहे.

रुपेश व दीपेश (दोन्ही नावे बदलली आहेत.) हे दोघे वर्ग मित्र, सातवी इयत्तेपासून एकाच वर्गात शिकत होते. तेव्हापासून दोघांमध्ये वर्गात प्रथम क्रमांक कोण मिळवणार यावरून स्पर्धा असायची. दोघे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका क्लासमध्ये ‘जेईईई’ तयारी करीत होते. रुपेश या ‘जेईईई’ च्या अॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झाला; मात्र दीपेश अॅडव्हान्स परीक्षेत नापास झाला होता.

दरम्यान, ‘जोसा’ या शासकीय वेबसाइटवर रुपेशने पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. जोसाच्या साइटवर अकाउंट उघडून त्याद्वारे २६४ महाविद्यालये निवडली; मात्र निवडलेली महाविद्यालये निश्चित करणे बाकी होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी रुपेश आणि अभियंता असणारे त्याचे वडील ही प्रक्रिया पूर्ण करणार होते. तोपर्यंत दीपेश याने रुपेशचे जोसा साइटवरील अकाउंट मोबाइलवर उघडून त्यात बदल केला. निवडलेली महाविद्यालये डिलीट केली.

हा प्रकार लक्षात आल्यावर रुपेशच्या वडिलांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, फौजदार नीलेश बोडखे यांच्याकडे घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रकरणी दीपेश याच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –