आंतरराष्ट्रीय युवा क्रिकेटपटु एजाज कुरेशी याचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते नागरी सत्कार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापुर येथिल युवा क्रिकेटपटु एजाज कुरैशी याने आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना कौतुकास्पद कामगिरी करत इंदापूर तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर नेल्याचे गौरवोदगार माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी इंदापूर येथे युवा क्रिकेटपटु एजाज कुरैशी याचा जाहिर नागरी सत्कार समारंभात बोलताना काढले.

एजाज कुरैशी याची टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. त्यादरम्यान इंग्लंड येथे झालेल्या भारत, इंग्लंड, इंडोनेशिया, जर्मनी, रवांडा, ब्राझील या देशांदरम्यान पार पाडलेल्या सामन्यात भारताने ब्राझील ला पराभुत करून विश्वचषक जिंकला.यामध्ये एजाज कुरैशी याने अष्टपैलू खेळ सादर करून आपल्या अष्टपैलु खेळाची चुणुक दाखविली. त्यानिमित्त इंदापुर शहराच्या वतीने एजाज कुरैशी याचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्कार समारंभाच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील बोलत होते.

बोलताना ते पुढे म्हणाले की विश्व चषकाच्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड अंतिम सामन्याला मी उपस्थित होतो. टेनिस बाँलवरील विजेता संघातील एजाजचा सत्कार वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉयड यांच्या हस्ते झाला. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सच्या मैदानावर त्याच्या खेळाचे कौतुक होणे ही अभिमानास्पद बाब आहे.

एजाजचे कौतुक होताना मला अतिशय आनंद झाला. येत्या काळात देखील तो आपल्या कामगिरीत सातत्य ठेऊन क्रिकेटमध्ये ठसा उमटवेल यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अंकिताताई पाटील, भरत शहा, कैलास कदम, रघुनाथ राऊत, बापु जामदार, जावेद शेख, शेखलाल बेपारी, अख्तर कुरैशी, शाबीर बेपारी, हाजी सादिक बेपारी, अब्राल बेपारी, जाकीर बेपारी, रमेश धोत्रे, नितीन मखरे, शकील सय्यद, ललेंद्र शिंदे, विजय शेवाळे, सलीम बागवान, संदीप चव्हाण, संतोष देवकर, अख्तर सय्यद, सलीम काझी, उजेर शेख उपस्थित होते.

आरोग्यविषय वृत्त –