कडक बंदोबस्तामुळे इंदापुरात सर्वत्र शांतता : मधूकर पवार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन ( सुधाकर बोराटे ) – आयोध्या येथिल बाबरी मस्जिद प्रकरणी निकाल जाहीर झालेनंतर इंदापूर शहरात कोणताही अणूचित प्रकार किंवा अघटीत घटना घडू नये यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने इंदापूर शहरात व तालुक्यातील त्या त्या भागात चोख व कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे इंदापूर शहर व तालुक्यात कोठेही अप्रिय घटना अथवा अणूचित प्रकार घडला नसुन सर्वत्र शांततामय वातावरण असल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मधूकर पवार यांनी दीली.

इंदापूर पोलीस निरिक्षक मधूकर पवार यांचे नेतृृत्वाखाली इंदापूर शहरात कडक बंदोबस्त ठेवतानाच शहरात एकूण 13 पोलीस पथके शहराच्या वेगवेगळ्या भागात सकाळपासुनच तैनात करण्यात आली होती. यामध्ये दर्गाह मस्जिद चौक, टेंभुर्णी नाका परिसर,नेहरू चौक, शेख मोहल्ला खाटीक गल्ली,खडकपूरा शिवाजीचौक, बाबा चौक, संभाजी चौक, श्रीरामवेस चौक अकलुज नाका, सरस्वतीनगर परिसर, कालठण रोड शासकीय रूग्णांलय परिसर, एस टी बस स्थानक परिसर इत्यादी ठीकाणी पोलीस बंदोबस्त पथके तैनात करण्यात आली होती. तर तालुक्यातील त्या त्या पोलीस स्टेशन चौकीअंतर्गत पुरेसा बंदोबस्त पुरवुन तालुक्यात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने इंदापूर शहर व तालुक्यात सर्वत्र कोठेही अणूचित प्रकार घडला नसल्याचे मधूकर पवार यांनी सांगीतले.

इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरिक्षक मधूकर पवार यांचेसह पाच पोलीस अधिकारी,६० पोलीस कर्मचारी, ४६ होमगार्ड यांचेसह फिरत्या गस्ती पथकांच्या माध्यमातुन इंदापूर शहर व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर पोलीस अधीकार्‍यांच्या माध्यमातु गस्ती पथकाद्वारे शहर व परिसरात फीरून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते.

शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने इंदापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चीत्र नार्माण झाले होते. समाजा समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज, फेसबुक मेसेज, कींवा अफवा पसरविणारे मेसेंज याबाबत पोलीसांकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत असुन असे तेढ नार्माण करणारे मेसेज पाठविणार्‍यांवर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरिक्षक मधूकर पवार यांनी सांगीतले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like