पोलीस पाटलांनी तहसिल, पोलीस व नागरिक यांचेतील दुवा बणून काम करावे : नारायण शिरगावकर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील यांनी नागरिकांची कामे करताना वेळोवेळी प्रशासनाचा पाठपुरावा करावा. पोलीस, महसूल आणि नागरिक यांमधील दुवा म्हणून प्रामाणिकपणे भूमिका बजवावी. अनुसूचित जाती -जनजातीतील पोलीस पाटलांनी न्यूनगंड बाळगु नये. पोलीस पाटील हे पद प्रतिष्ठेचे असून महत्त्वाच्या कामाचे आहे. त्यामुळे या पदावर काम करत असताना नि:पक्षपाती वर्तन फार महत्वाचे असून पोलीस पाटलांनी समस्येची सोडवणूक करताना संघटितरीत्या कामे करण्याचे आवाहन बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी इंदापूर येथे बोलताना केले.

मंगळवार (दि. १७ डिसेंबर) रोजी शासकिय विश्रामगृह इंदापूर येथील सर विश्वेश्वरय्या सभागृहामध्ये इंदापूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने ‘पोलीस पाटील दिना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी नारायण शिरगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती सोनाली मेटकरी, इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे, पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, भिगवन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व तालुक्यातील सर्व पोलीस पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या काही समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे उपाय योजना केल्या जातील. असे आश्वासन शिरगावकर यांनी दीले.

यावेळी तहसिलदार सोनाली मेटकरी बोलताना म्हणाल्या की पोलीस पाटलांची उपयोगिता, जबाबदाऱ्या, कर्तव्य व गौण खनिज चोरी रोखण्यासाठी पोलीस पाटलांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले. विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मतदान प्रक्रियेमध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे कामी दिलेल्या योगदानाबद्दल तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. गौण खनिज चोरी रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस पाटील सुमन शिवलाल चितारे व्याहळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप पोळ पाटील यांनी केले, सूत्रसंचालन सोमनाथ सोनवणे पाटील व किरण खंडागळे पाटील यांनी केले .

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/