ICC World Cup 2019 : पाकिस्तानी संघ मिसफिल्डिंगमुळे ‘हैराण’, ‘परेशान’  

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लक्षवेधी भारत – पाक सामना सुरु होताच पाकिस्तानचे कमकुवत क्षेत्ररक्षण दिसून येत आहे. रोहित शर्माला पाकिस्तानच्या कमकुवत क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळाला आहे. रोहित शर्माची विकेट जाता जाता वाचली आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांमध्ये चोरटी धाव काढताना रोहित शर्मा बाद होण्याची शक्यता होती. पाकिस्तानचे क्षेत्ररक्षक प्रचंड दबावाखाली खेळताना दिसत आहेत.

रोहित शर्माने या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेऊन अवघ्या ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. लोकेश राहुलच्या सोबत रोहित शर्माने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. रोहित शर्माने टोलवलेल्या दोन उतुंग चेंडूवर रोहित बाद होण्याची शक्यता होती परंतु पाकिस्तानच्या फलंदाजांना ते उडालेले झेल झेलण्यात अपयश आले. पाकिस्तानच्या या गचाळ क्षेत्ररक्षणाची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानचे गोलंदाज बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी करत आहेत मात्र पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांकडून गोलंदाजांना योग्य साथ मिळताना दिसून येत नाहीय.

दरम्यान, पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजाला आमंत्रित केल्याचा फटका भारताच्या पथ्यावर पडताना दिसून येत आहे.

सिने जगत –

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’