home page top 1

ICC World Cup 2019 : पावसाने पाकिस्तानची ‘जिरवली’, २३ ओव्हरमध्येच पाकिस्तान ‘बिथरले’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मँचेस्टरच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान मधील सर्वात मोठा हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज पर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. मात्र आजच्या सामन्यात पाकिस्ताने प्रथम गोलंदाजी घेऊन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या सलामीच्या जोडीने पाकिस्तानचा दबाव झूगारून लावत पहिल्या २३ ओव्हरमध्ये १३४ धावसंख्या उभारली. यामुळे पाकिस्तानचा संघ बिथरला असून त्यांच्याकडून मिसफिल्डींग होताना दिसत आहे.

विश्वचषक स्पधेत आत्तापर्यंत भारत पाकिस्तान सहा वेळा आमने-सामने आले आहेत. या सर्व सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. आजचा होणारा सामना जिंकून भारताला विश्वचषकात ७-० ने मनवण्यासाठी ‘विराट’ सेना मैदानात उतरली आहे. आठवडाभर मँचेस्टरमध्ये पाऊस पडत होता, मात्र, कालपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे आजच्या सामन्यावरचं संकट टळलेलं आहे.

या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने अनेकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. तर पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय पहिल्या वीस ओव्हरमध्येच फोल होताना दिसत आहे. भारतीय संघाचा शिखऱ धवन दुखापतग्रस्त झाल्याने विजय शंकरला संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्याची सुरुवात केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी केली. रोहितच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या २३ ओव्हरमध्ये १३४ धावा करून भारत पाकिस्तान समोर धावांचा मोठा डोंगर उभारणार असल्याचे दाखवून दिले.

रोहित शर्मा ७४*
के एल राहुल ५७*

Loading...
You might also like