लष्करानं दिला 1965 आणि 1971चं युध्द लढणार्‍यांना ‘स्वातंत्र सैनिक पेन्शन’ देण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, १९६५ आणि १९७१ च्या युद्धाच्या सैनिकांना निवृत्तीवेतन देण्यात यावे असा सैन्याने प्रस्ताव दिला आहे, चौथ्या ‘आर्म्ड फोर्स व्हेटरन्स डे’ निमित्त आयोजित एका समारंभात त्यांनी याबाबत सांगितले.

याअगोदर नौसेना प्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंह यांनी मंगळवारी माजी सैनिकांना सांगितले की, समाजात आपल्या प्रतिष्ठेचा वापर सोशल मीडियावर सैन्याबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी करावा.

करमवीर सिंह म्हणाले, ‘विद्यमान सैनिक आणि माजी सैनिक यांच्यातील संबंध अमिट आणि शाश्वत आहे. आपल्या सूचना, विनंत्या, शिफारसी आणि पाठ्यक्रमात सुधारणा या संदर्भात तुम्ही सैन्याशी कधीही संपर्क साधू शकतात.’ तसेच त्यांनी माजी सैनिकांना सोशल मीडियावर सैन्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी समाजात त्यांची प्रतिष्ठा वापरण्याचे आवाहन देखील केले.

अ‍ॅडमिरल म्हणाले, ‘हे माहितीचे युग आहे जिथे सैन्याबद्दल अनेक चांगली माहिती सोशल मीडियावर शेअर केली जाते. तिथेच काही मिथक आणि गैरसमज देखील सोशल मीडियावर पसरवले जातात’. ते म्हणाले, “मी प्रत्येकास त्यांची प्रतिष्ठा समाजात वापरण्यासाठी विनंती करू इच्छितो, जर सैन्याबाबत कोणी मिथक किंवा गैरसमज पसरवत असतील तर कृपया आपण हे सुनिश्चित करावे की मीडियावर लष्कराची प्रतिमा ही सकारात्मकतेची असावी.

फेसबुक पेज लाईक करा –