‘ही’ आहेत देशातील ५ टॉपची विद्यापीठं, प्रवेशासाठी प्रत्येकाचीच ‘इच्छा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत असे अनेक उत्कृष्ट विद्यापीठे आहेत, ज्यात प्रवेश मिळवणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. भारतातीलच नाही तर बाहेरील देशातील विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येतात. देशातील सर्वोत्कृष्ट ५ विद्यापीठांची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. ज्यात जगातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असतो.

1. यूनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली

यूनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली ही भारतातील सर्वात चांगली आणि प्रतिष्ठित यूनिव्हर्सिटी आहे. १९२२ मध्ये या युनिव्हर्सिटीसी स्थापना झाली. सध्या दर वर्षी लाखो विद्यार्थी प्रवेशासाठी येथे अर्ज करतात. जीयोलॉजी, झूलॉजी, केमेस्ट्री, सोशियोलॉजी, हिस्ट्री या सर्व क्षेत्रातून तुम्हाला पदवी घेता येते.

2. यूनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता


यूनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता ही सुद्धा भारतातील पहिल्या ५ यूनिव्हर्सिटीच्या क्रमात येते. १८५७मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली आहे. दिल्लीनंतर या यूनिव्हर्सिटीचा दुसरा नंबर लागतो.

3. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरू


BRICS रँकिंग मध्ये भारतात इंडियन यूनिव्हर्सिटी इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरू ५ व्या स्थानावर आहे. संपूर्ण आशियात या युनिव्हर्सिटीची रँकिंग ३४ व्या स्थानावर आहे. ४०० एकरात असलेल्या पसरलेल्या या विद्यापीठात ४० वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत.

4. बनारस हिंदू विश्वविद्यालय


बनारस हिंदू विश्वविद्यालय हे बनारसमध्ये आहे. हे विश्वविद्यालय जगात प्रसिद्ध आहे. एकेकाळी हे विद्यापीठ जगातील सर्वोत्कृष्ठ विद्यापीठ होते. १९१६ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी याची स्थापना केली. एनआयआरएफ ने या विद्यापीठाला पहिल्या १० विद्यापीठांच्या यादीत ठेवले आहे.

5. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय


एनएसीसी (NACC) ने जुलै २०१२मध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये हे विद्यापीठ देशातील सर्वात चांगले कॉलेज म्हटले आहे. NACC ४ पैकी ३.९ गुण दिले आहेत. हे गुण कोणत्याही विद्यापीठाला दिले गेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –