प्रसिध्द किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनी वादावर दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर कीर्तनात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. निवृत्ती महाराज यांनी आता या आरोपांना उत्तर दिले आहे. सुरु असलेला वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करू असा इशारा निवृत्ती महाराज यांनी दिला आहे. विशेष म्हणजे एका कीर्तनातूनच निवृत्ती महाराजांनी सुरु असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.

गेली २६ वर्ष मी कीर्तन करून कष्ट करतोय त्यात एखाद वाक्य चुकीचं जात परंतु मी केलेले हे विधान चुकीचे नाही असे म्हणत यावेळी निवृत्ती महाराज यांनी अनेक ग्रंथात याचा उल्लेख असल्याचे देखील सांगितले आहे. तसेच ज्यांनी आरोप केलेत ते सर्व युट्युब वाले आहेत असे सांगत युट्युब संपेल परंतु मी संपणार नाही असे देखील महाराज यावेळी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे एका चालू कीर्तनातच निवृत्ती महाराजांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर दिल्याचे पहायला मिळाले.

सुरु असलेल्या आरोपामुळे तीन दिवसात अर्धा किलो वजन कमी झाल्याचे देखील इंदोरीकर महाराजांनी सांगितले. तसेच आपली कॅपेसिटी संपली आरोप थांबले नाहीत तर कीर्तन बंद करून शेती करणार असल्याचे देखील महाराजांनी चालू कीर्तनातून स्प्ष्ट केले. १४ फेब्रवारी शुक्रवारी रात्री बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या एका कीर्तनात महाराजांनी आरोपांना उत्तर दिले आहे.

काय आहेत निवृत्ती महाराजांवरचे आरोप
समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. तशा वक्तव्याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like