IPL 2019 : चेन्नई एक्सप्रेसची विजयी घोडदौड रोखण्यात हैदराबादला यश

हैदराबाद : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईची विजयी घोडदौड रोखण्यात हैदराबाद संघाला यश आले आहे. चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्यात हैदराबादने चेन्नईवर मात केली आहे. या समान्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने सुरुवात तर छान केली. मात्र, मधली फळी खास कामगिरी करू शकली नाही, त्यामुळे हैदराबादसमोर फक्त १३२ धावांचेच आव्हान दिले. हैदराबादनेही ते सहज पूर्ण करत विजय मिळवला.

चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ७९ धावांची सलामी दिली. वॉटसनने यावेळी २९ चेंडूंत ३१ धावा केल्या. शेनपेक्षा फॅफ चांगल्या फॉर्मात होता. फॅफने ३१ चेंडूंत ४५ धावांची खेळी साकारली. या ४५ धावांच्या खेळीत फॅफने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. मात्र त्यांची उत्तम खेळीचा फायदा संघाला घेता आला नाही. हैदराबादचे जॉनी बेअरस्टोव आणि डेव्हीड वॉर्नर या दोघांची सलामी हैदराबाद संघाच्या पथ्यावर पडली. हैदराबादच्या विजयात या दोघांचा मोलाचा वाटा आहे.

दरम्यान, या समन्यात एक वाद पाहायला मिळाला. हा वाद नो-बॉलवरून झाला होता. चेन्नईचे रवींद्र जडेजा आणि अंबाती रायुडू हे खेळत होते. तेव्हा भुवनेश्वर गोलंदाजी करत होता. अखेरच्या षटकातील तिसरा चेंडू टाकताना ते बाऊन्सर टाकला. त्यानंतरचाही चेंडू त्याने बाऊन्सर टाकला. नियमानुसार हा बॉल नो बॉल होता. मात्र पंचानी हा नो-बॉल दिला नाही. त्यावेळी दोघांनीही मैदानावर पंचाशी वाद घातला. मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते.