महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून, राज्यात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावात सेंट लॉरेन्स जवळील देविदास कॉलनीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. श्याम दीक्षित असे या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. या खुनामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, श्याम दीक्षित हे शनिवारी रात्री काव्यरत्नावली चौकात आयोजित दहीहंडी उत्सवाला उपस्थित होते. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता हे घरी आले. त्यानंतर त्यांना एक मोबाईल फोन आला. फोनवर बोलल्यानंतर ते घराजवळच असलेल्या कृपाळू साईबाबा मंदिराजवळ आले. त्यानंतर त्यांचा कोणाशी संपर्क झाला नव्हता.

रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या  लोकांनी श्याम दीक्षित यांचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांच्यावर दगडाने ठेचून खून केल्याचे दिसून आले. लोकांनी हा प्रकार पोलिसांना कळविला असून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दीक्षित यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणाने झाली. त्यांना रात्री कोणाचा फोन आला. त्यामुळे ते घरातून पुन्हा बाहेर आले, याच्या हत्येचा व आलेल्या फोनचा काय संबंध याचा तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like