जयदत्त होळकर यांच्या विजयाने होळकर कुटुंबाचे स्वप्न झाले पूर्ण

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. नाशिक विभागातून महाविकास आघाडीचे जयदत्त होळकर तर अपक्ष उमेदवार अद्वय प्रशांत हिरे विजय झाले. जयदत्त होळकर यांच्या विजयाने होळकर कुटुंबियांचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सदस्य होण्याचे स्वप्न पंधरा वर्षानंतर पूर्ण झाल्याने संपूर्ण होळकर कुटुंबांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मुंबई मार्केट निवडणूक अद्वय हिरे नाशिक महसूल विभागातून सर ७३८ पैकी ५३० मते मिळाली तर जयदत्त होळकर ४०२ मते मिळून विजयी झाले.

लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांच्या पराभवासाठी नाशिक जिल्ह्यातील मोठी राजकीय लॉबी कार्यरत होती मात्र जयदत्त होळकर यांच्या पाठीशी छगन भुजबळ यांचा असलेला हात, होळकर यांना सभापती तसेच संचालक पदाचा असलेला अनुभव आणि राजकीय कौशल्य वापरत नाशिक विभागातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेत विरोधकांच्या चारीमुंड्या चीत करत निवडून आल्याने समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

सन 2004-05 मध्ये जगदीश होळकर यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती त्यावेळी त्यांचा 23 मतांनी पराभव झालेला होता. छगन भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे जयदत्त होळकर यांना भुजबळ यांनी महाविकास आघाडीतर्फे नाशिक विभागातून उमेदवारी देत आज जयदत्त होळकर विजयी झाल्याने होळकर कुटुंबियांचे मुंबई बाजार समितीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. नाशिक विभागातून गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये उषाताई शिंदे या बिनविरोध सदस्य म्हणून निवडून गेलेल्या होत्या. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांचा पराभव करण्याचा विडा उचललेला होता. मात्र त्यामध्ये त्यात ते अपयशी झाल्याने भुजबळ यांनी जयदत्त होळकर यांना उमेदवारी देत निवडून आणले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवत आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने पॅनल तयार केले. भाजपने प्रथमच बाजार समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असले तरी त्यांना अधिकृतपणे पॅनल उभे करता आलेले नाही. राज्यातील ३०५ बाजार समिती व ६२५ उपमार्केटची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक निकाल लागला असून बाजार समितीवर महा विकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. ४३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बाजार समितीवर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रभुत्व आहे.