कऱ्हा नदीचे रौद्ररूप नदीचे पाणी शिरलं नाझरे, कापरेवस्ती गावात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यात ढगफुटी सारखा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असुन तालुक्यातील कऱ्हा नदीला कधी नव्हे असा महापूर आला आहे. तरी नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा काल पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला होता.
Jejuri
रात्री झालेल्या ढग फुटी सारख्या पावसामुळे कऱ्हा नदीला महापूर आल्याने नदीच पाणी नाझरे, कापरेवस्ती गावात शिरलं या गावातील घरे पाण्याखाली गेल्याने मध्य रात्रीच गाव रिकामं केल्याने मोठी जीवित हानी टळली. कऱ्हा नदीतील महापुरामुळे नाझरे धरणाच्या लाभ क्षेत्रातील रानमळा गावात कालच्या अतिवृष्टीने कऱ्हा नदीपात्रातील रानमळा गावातील ५०-६० विद्युत मोटारी वाहून गेल्या असून शेतीतील पिके (डाळिंब, भाजीपाला, गुरांचे खाद्य) यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, गावात पाणी शिरल्याने गुरे तसच नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
Jejuri

सकाळपासून पूर पाणी ओसरायला लागले असले तरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कऱ्हा नदीत ८० ते ९० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे. तरी नदीकाठच्या नागरीकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Visit : policenama.com