जेजुरीत जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रम

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरीत आज पहाटे जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने स्वरांनी उजळली दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथमेश मोरे व सहकाऱ्यांनी या सुरेख कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

येथील सेवेकरी मंगल कार्यालयात पार पाडलेल्या कार्यक्रमात सुरवातीला गणरायाला वंदन करून भक्तिगीते, भावगीते व चित्रपट गीते यांचे सादरीकरण प्रथमेश मोरे व कलाकारांनी केले. कानडा राजा पंढरीचा, अबीर गुलाल, अश्विनी येना, रुपेरी वाळूत, राजसा जवळी जरा बसा, वाऱ्यावरती गंध पसरला, तसेच हिंदी चित्रपटातील काही जुनी गाणी सुजाता जोशी व विनल देशमुख यांनी गायली. त्यांना साथ संगत सिंथेसायझरवर आकाश काळोखे, तबला रोहन पवार, पॅडवर सोमनाथ फाटके यांनी केली.

या कार्यक्रमात प्रथमेश मोरे यांनी आर. डी. बर्मन यांची व काही जुनी गाणी सॅक्सोफोनवर सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात जेजुरी येथील मेधा पवार हिचा जेजुरीतील पहिली अरंगेत्रम (भरतनाट्यम नृत्य) पदक पूर्ण केल्याबद्दल कलर मराठी वाहिनीवरील महाराष्ट्रातील संगीत सम्राटमधील विजेता व शाळेतील मित्र प्रथमेश मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कलाकारांचे सत्कार प्रसिद्ध तबला वादक अमोल बेलसरे यांच्या हस्ते केले. सूत्रसंचालन जावळेकर यांनी केले, तर आभार रुपाली कड यांनी मानले.

Visit : policenama.com