home page top 1

जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याची सांगता चित्त थरारक ‘खंडा’ (तलवार) कसरत स्पर्धेने

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – आज जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याची सांगता ही खंडा कसरत स्पर्धेने झाली. आज झालेल्या खंडा कसरत स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपली कसरत दाखवली. या स्पर्धकांमधून श्री मार्तंड देवसंस्थान कडून ४२ किलो वजनाची तलवार एका हाताने तोलून धरणे यामधून तीन क्रमांक आणि विविध चित्तथरारक कसरती करणे यामधून तीन क्रमांक काढण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी दोन – दोन क्रमांक काढण्यात आले.

श्रीमार्तंड देवसंस्थान कडून या स्पर्धकांना प्रथम क्रमांक साठी सन्मान चिन्ह व 21 हजार रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी सन्मान चिन्ह व 15 हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी सन्मान चिन्ह व 11 हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

४२ किलो वजनाची तलवार एका हाताने तोलून धरणे यामध्ये प्रथम क्रमांक रमेश दत्तात्रय शेरे याने 17 मिनिटे 13 सेकंद तलवार तोलून धरली तर द्वितीय क्रमांक मंगेश चव्हाण याने 5 मिनिटे 38 सेकंद तलवार तोलून धरली आणि तृतीय क्रमांक हेमंत माने याने 5 मिनिट 30 सेकंद तलवार तोलून धरली तर उत्तेजनार्थ म्हणून निखिल खोमणे व विजय कामथे यांना देण्यात आले.

विविध प्रकारच्या कसरती मध्ये प्रथम क्रमांक सचिन शिवाजी कुदळे द्वितीय क्रमांक शिवाजी माणिक राणे आणि तृतीय क्रमांक नितीन शिवाजी कुदळे याने मिळविला आणि उत्तेजनार्थ म्हणून अक्षय गोडसे व विशाल माने यांना देण्यात आले. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like